एमएस-सीआयटी (MS-CIT) हा माहिती तंत्रज्ञान (Information Technology - IT) साक्षरता अभ्यासक्रम आहे, जो एमकेसीएल (MKCL - महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) ने 2001 साली सुरू केला. हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आयटी साक्षरता अभ्यासक्रम मानला जातो.
माहिती तंत्रज्ञानाच्या विविध संकल्पना व शोध-संशोधनांविषयी जागरूकता
आजचा युग म्हणजे तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण जिथे पाहतो तिथे माहिती तंत्रज्ञानाचा (Information Technology) वापर दिसतो — शिक्षण, आरोग्य, उद्योग, बँकिंग, शेती, वाहतूक, सगळ्याच क्षेत्रांमध्ये IT चा प्रभाव वाढलेला आहे.
कार्यक्षम आणि स्मार्ट कामासाठी ऑफिस ऑटोमेशन टूल्सचे ज्ञान
डेटा एंट्री आणि व्यवस्थापन
दस्तऐवज तयार करणे आणि शेअर करणे
वेळापत्रक तयार करणे आणि बैठका ठरवणे
इ-मेल आणि संवाद
कामांचे नियोजन आणि प्रगतीचा मागोवा
करिअर व नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये आणि नवयुगातील अभ्यास कौशल्ये
स्पष्ट बोलणे व ऐकणे
इंग्रजी व स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान
ई-मेल लेखन, प्रेझेंटेशन कौशल्य
वेळेचं नियोजन करणं
काम वेळेत पूर्ण करणं
प्राधान्य ठरवणे
दैनंदिन जीवनासाठी आवश्यक डिजिटल कौशल्ये
आजचा काळ डिजिटल युग आहे. मोबाईल, इंटरनेट आणि संगणक यांचा वापर केवळ ऑफिस किंवा शिक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काही मूलभूत डिजिटल कौशल्ये आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे.
सोशल मिडिया कौशल्ये – यशस्वी डिजिटल संवादासाठी
सोशल मिडिया कौशल्य म्हणजे विविध सोशल प्लॅटफॉर्म्स (जसे की Facebook, Instagram, WhatsApp, YouTube, LinkedIn इ.) चा योग्य, प्रभावी व सुरक्षित वापर करून संवाद साधणे, माहिती पसरवणे, ब्रँड प्रमोट करणे किंवा डिजिटल ओळख तयार करणे.
स्मार्ट टायपिंग कौशल्ये – वेगवान व अचूक कामगिरीसाठी
आजच्या डिजिटल युगात संगणक, लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करताना टायपिंग हे मूलभूत पण अत्यंत उपयुक्त कौशल्य बनले आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, फ्रीलान्सर किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्मार्ट टायपिंग स्किल्स शिकणे ही काळाची गरज आहे.